esakal | आंदोलनस्थळी आमचं थडगं बांधलं तरी मागे हाटणार नाही - राकेश टिकैत
sakal

बोलून बातमी शोधा

Rakesh Tikait

आंदोलनस्थळी आमचं थडगं बांधलं तरी मागे हाटणार नाही - राकेश टिकैत

sakal_logo
By
सुधीर काकडे

केंद्र सरकारने लागु केलेल्या तीन कृषी (Agriculture Law) कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये शेतकऱ्यांनी (Farmers Protest) किसान महासभेचे आयोजन केले होते. या आंदोलनातून शेतकऱ्यांनी आज पुन्हा केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिल्लीत सुरु असणाऱ्या आंदोलनस्थळी आमचे थडगे बांधले तरी आम्ही मागे हाटनार नाही असे म्हणत केंद्र सरकार विरोधात शड्डू ठोकला आहे. या सभेत शेतकऱ्यांनी २७ नोव्हेंबरला बंदची हाक दिली आहे.

अडेलतट्टू सरकारला झूकवण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून आपला विरोध दाखवावा लागणार असल्याचे आवाहन यावेळी राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना केले. सरकारने अनेक रेल्वे आणि विमातळ विकून टाकली, अनेक गोष्टींचे खासगीकरण केले. शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण झाल्या शिवाय मी आता मुझफ्फरनगरच्या मातीत पाय ठेवणार नाही. जीव गेला तरी गाझीपुर सीमेवर सुरु असलेला मोर्चा आम्ही मागे घेणार नाही असे म्हणत टिकैत यांनी केंद्र सरकार विरोधात पुन्हा एकदा दंड थोपटले. शेतकरी नेते वीरेंद्र सिंह म्हणाले, "शेतकऱ्यांच्या जमिनी कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा घाट केंद्राने घातला आहे. त्यासाठी त्यांना हरवावे लागेल. त़्याची सुरवात उत्तर प्रदेशमधून करू. येत्या निवडणुकीत योगी सरकारला धूळ चारू."

हेही वाचा: सरकार को मिलेगी वोट की चोट;पाहा व्हिडिओ

योगेंद्र यादव म्हणाले, "शेतकऱ्यांची महापंचायत ही सो सोनार की एक लोहार की. नऊ महिन्यांपासून लोक म्हणत आंदोलन ढिले पडले, पण त्याचे उत्तर आज केंद्राला मिळाले . पाच वर्षांत योगीने पाच पापं केली आहेत. कर्जमाफीच्या नावाखाली ढोंग , हा योगी नाही ढोंगी आहे. गेल्या चार वर्षांत उसाचा भाव वाढविला नाही. शेतकऱ्यांच्या बिलांची थकबाकी मिळाली नाही. योगी नाही , हा लुटेरा आहे. हे सरकार जुमलेबाज आहे. मोदी सरकारने पीक विम्याचे आश्वासन दिले. यूपीमध्ये गेल्यावर्षी 72 लाख शेतकऱ्यांचा विमा होता, आता 47 लाख लोकांचा विमा आहे. ही फसवणूक आहे."

loading image
go to top