अम्मांच्या स्मरणार्थ महसूलमंत्र्यांनी उभारले मंदिर;एमजीआर-जयललिता यांचे ब्राँझचे पुतळे

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 1 February 2021

कौटुंबिक नेते म्हणून असे या मंदिराचे वर्णन केले आहे.मदुराई जिल्ह्यातील टी कुन्नथूर येथे उभारलेल्या मंदिराचे अनावरण मुख्यमंत्री एडापड्डी के.पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी शनिवारी केले

चेन्नई - अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा दिवंगत जयललिता यांच्या स्मारकाचे चेन्नईत नुकतेच उद्‌घाटन झालेले असताना महसूलमंत्री आर. बी. उदयकुमार यांनी आपल्या मतदारसंघात जयललिता आणि एम.जी. आर यांच्या स्मरणार्थ मंदिर उभारले आहे. कौटुंबिक नेते म्हणून असे या मंदिराचे वर्णन केले आहे. मदुराई जिल्ह्यातील टी कुन्नथूर येथे उभारलेल्या मंदिराचे अनावरण मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी शनिवारी केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उदयकुमार यांच्या मतदारसंघात टी. कुन्नथूर येथे १२ एकरावर मंदिर उभारले आहे. या मंदिरात माजी मुख्यमंत्री एम.जी आर आणि जयललिता यांचे ब्रांझचे पुतळे असून त्याचे अनावरण करण्यापूर्वी मंदिर पवित्र करण्यासाठी पारंपरिकरीत्या पूजा करण्यात आली. यावेळी पुजाऱ्यांकडून गाईची पूजा करण्यात आली. त्यानंतर मंत्री उधयकुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रसादम म्हणून पवित्र पाणी उपस्थितांना देण्यात आले. याच पाण्याने एमजीआर आणि जयललिता यांच्या पुतळ्याची पूजा करण्यात आली. मंदिराच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी एमजीआर आणि जयललिता हे पक्ष कार्यकर्त्यांसाठी देवासमान असून त्यांनी राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. अशा दोन नेत्यांसाठी उभारलेले मंदिर पूजनीय आहे, असे नमूद केले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Edapaddy K temple T Kunnathur in Madurai district