मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

चेन्नई- मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती सुधारली असल्याची माहिती अण्णा द्रमुकतर्फे आज (गुरुवार) देण्यात आली. जयललिता गेल्या महिन्याभरापासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना भेटण्यासाठीही मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी पक्षाचे कार्यकर्ते सतत प्रार्थनेचे आयोजन करीत आहेत. जयललिता यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिल्याचे अभिनेत्री शारदा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जयललिता यांची प्रकृती सुधारत असून त्या आता नेहमीप्रमाणे जीवन जगत असल्याचे काल अण्णा द्रमुकतर्फे सांगण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारली असून, त्या आता नेहमीप्रमाणे जेवण घेत आहेत, असे पक्षाचे नेते सी. आर. सरस्वती यांनी सांगितले. अण्णा द्रमुकचे प्रवक्ते एस. रामचंद्र म्हणाले, की जयललिता यांची प्रकृती सुधारत आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्‍वास वाढला आहे, त्यांची प्रार्थना फळाला आल्याची त्यांची भावना आहे.

Web Title: Chief Minister Jayalalithaa's health condition improving