मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात परतले

Chief Minister Manohar Parrikar returned to Goa
Chief Minister Manohar Parrikar returned to Goa

पणजी : दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास दाबोळी विमानतळावर उतरले. त्यांना दाबोळी येथून त्यांच्या ताळगाव येथील निवासस्थानी एअर अॅम्बुलन्समधून पोलिस बंदाेबस्तात नेण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री पर्रीकर हे अचानक गोव्यात परतण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. ते रुग्णालयातून राज्य कारभार चालवत असल्याने गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून जोरदार टीका सुरू होत्या. सरकार बरखास्त करण्याची मागणीही काँग्रेससह शिवसेनेने राज्यपालांची भेट घेऊन केली होती. 

दरम्यान, मंत्रिमंडळाची बैठकही गेला दीड महिना झालेली नाही. तसेच त्यांच्याकडे असलेली काही खाती इतर मंत्र्यांना वाटप करायची आहेत. त्यामुळेही ते गोव्यात परतल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com