'मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अद्याप निश्‍चित नाही'

पीटीआय
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

लखनौ - उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार जाहीर करायचा अथवा नाही, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज पत्रकारांना सांगितले. राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांतही अशा प्रकारे उमेदवार जाहीर केला नव्हता, असे शहा यांनी निदर्शनास आणून दिले.

आगामी विधानसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह अथवा खासदार योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करणार का, असा थेट प्रश्‍न अमित शहा यांना आज पत्रकारांनी विचारला. या वेळी ते म्हणाले, ""भाजपमध्ये अंतर्गत लोकशाही आहे. कोणत्याही विशिष्ट घराण्यात जन्माला आला म्हणून तो नेता होईल, असे आमच्या पक्षात नाही. प्रत्येकाला पक्षासाठी कष्ट घ्यावे लागतात, त्यामुळे अद्यापही मुख्यमंत्री म्हणून कोणाचेही नाव पुढे करण्याबाबत निर्णय झालेला नाही.'' देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान देण्याची उत्तर प्रदेशची क्षमता असून, या राज्याचा विकास झाल्याशिवाय देशाचा पूर्ण विकास होणार नाही, असेही मत शहा यांनी व्यक्त केले. भाजपचा विकासाच्या राजकारणावर विश्‍वास असून, उत्तर प्रदेशमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, त्यासाठी माझा पक्षही मजबूत करण्याचे माझे उद्दिष्ट आहे, असेही शहा म्हणाले.

Web Title: Chief ministerial candidate has not yet decided