
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ९ वर्षांच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिच्या दत्तक आईवर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगी रडताना आणि तिच्या जखमा दाखवताना दिसत आहे. मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, मुलगी तिच्या आई आणि तिच्या दोन भावांवर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप करते. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा येथील आहे. पोलिसांना महिलेला ताब्यात घेतले आहे.