पालकांनो काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पाहाच...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

एका वेगात चाललेल्या मोटारीचा दरवाजा उघडून चिमुकला रस्त्यावर जोरात पडला. परंतु, पाठीमागील वाहनाने जोरात ब्रेक दाबल्यामुळे चिमुकल्याचे जीव वाचला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली: एका वेगात चाललेल्या मोटारीचा दरवाजा उघडून चिमुकला रस्त्यावर जोरात पडला. परंतु, पाठीमागील वाहनाने जोरात ब्रेक दाबल्यामुळे चिमुकल्याचे जीव वाचला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मोटार चालवणाऱया पालकांनो हा व्हिडिओ पाहाच, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स व्हिडिओ पाहिल्यानंतर देत आहेत.

Video: धुर्त कोल्ह्याने अस् फसवलं सिंहाला...

चारचाकी वाहनामधून अनेकजण प्रवास करत असतात. परंतु, वाहनाचे चाईल्ड लॉक न लावल्यास काय होऊ शकते, हे व्हिडिओमधून पाहायला मिळते. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या वाहनामध्ये मुलं असेल तर काळजी घ्या, असे कळकळीचे आवाहन नेटिझन्स करत आहेत.

आयपीस अधिकारी पंकज नैन यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. परंतु, हा व्हिडिओ कोणत्या भागातील आहे, हे समजू शकलेले नाही. व्हिडिओमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीतून मुलगा रस्त्यावर पडला. त्यावेळी मागून येणाऱ्या गाडीने जोरात ब्रेक दाबला. लहान मुलगा ज्या मोटारीतून पडला ती मोटार तत्काळ थांबली व एका व्यक्तीने लगेच पळत येऊन मुलाला उचलले. मुलाचे नशिब बलवत्तर होते, म्हणून त्याला दुखापत होऊ शकली नाही. पण, थोडासा बेजबाबदारपणा चिमुकल्यांच्या जीवावर बेतू शकतो. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

शरीराच्या 'या' भागावार 'तीळ' असेल तर तुम्ही...

आयपीएस पंकज नैन यांनी व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, 'मोटारीमध्ये लहान मुलं असताना चाइल्ड लॉक आणि चाइल्ड सिट खूप महत्वाचे आहे. सर्व दरवाजे नीट बंद झाले आहेत का बघा. चाइल्ड लॉक केल्याची खात्रीही करून घ्या. सर्वच मुलं या मुलासारखी लकी नसतात.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child falls running car shocking video shared by ips officer