Child Forced into Bonded Labour in Madhya Pradesh Rescued After 6 Years

Child Forced into Bonded Labour in Madhya Pradesh Rescued After 6 Years

Esakal

५० हजारांचं कर्ज फेडलं नाही, कंत्राटदाराने ७ वर्षांच्या मुलाला घरकामासाठी ठेवून घेतलं; ६ वर्षांनी सुटका पण...

Crime News : आई-वडिलांना ५० हजारांचं कर्ज फेडता न आल्यानं ७ वर्षांच्या मुलाला कंत्राटदाराने घरकामासाठी ठेवून घेतलं. आता ६ वर्षांनी मुलाची सुटका केली पण आई-वडिलांकडे ओळखीचा पुरावा नसल्यानं त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आलंय.
Published on

केवळ ५० हजार रुपयांचं कर्ज फेडता न आल्यानं सहा वर्षांच्या मुलाला ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल इथं ही घटना घडलीय. मोलमजुरी करणाऱ्या गंजू उईके यांनी ठेकेदाराकडून ६ वर्षांपूर्वी ५० हजार रुपये कर्ज घेतलेलं. पण ते फेडता न आल्यानं त्यांच्या ७ वर्षांच्या मुलाला ठेकेदारानं घरकाम आणि जनावरं राखण्यासाठी ठेवून घेतलं होतं. आता एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुलाची सुटका करण्यात आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com