आईच्या कुशीतून उचलले; बलात्कार केला अन् कापला गळा

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

जमशेदपूर (झारखंड): तीन वर्षांची चिमुकली आईच्या कुशीत झोपली होती. एकाने तिला अलगद उचलले. दोघांनी दिवसभर अत्याचार करत सामूहिक बलात्कार केला. संध्याकाळी चिमुकलीचा गळा कापून मृतदेह फेकून दिला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

आईच्या कुशीतून चिमुकलीचे अपहरण करत असताना दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटीझन्सनी संताप व्यक्त केला आहे. अपहरणाची घटना 26 जुलै रोजी टाटानगर रेल्वेस्टेशनमध्ये घडली होती. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे.

पोलिस अधीक्षक एहतेशाम वकारीब यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांच्या मुलीचे 26 जुलै रोजी रात्री अपहरण करण्यात आले होते. मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे काही जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान दोघांनी सामूहिक बलात्कार करून खून केल्याचे सांगितले. पीडित मुलीचे डोके शोधण्यासाठी श्वानाची मदत झाली.

आरोपींपैकी एकाचे नाव रिंकू साहू असे आहे. 2015 मध्ये त्याने एका मुलाचे अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. या आरोपातून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. नुकतीच त्याची सुटका झाली होती. सुटकेनंतर त्याने व कैलास नावाच्या त्याच्या मित्राने हे कृत्य केले आहे. दोघांची वये 30 आहेत. दोघांनी दिवसभर अत्याचार केला. चिमुकली रडणे थांबवत नसल्याने गळा चिरून हत्या केली, असे त्यांनी तपासादरम्यान सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Kidnapped From Jamshedpur Station, Then Raped And Beheaded