
देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा पाळल्या जात असल्या तरी यातील अनेक परंपरा केवळ आश्चर्यकारकच नाहीत तर काही अविश्वसनीय देखील आहेत. मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात राहणाऱ्या धनगर समुदायाचीही अशीच परिस्थिती आहे. या समाजात मुले जन्माला येण्यापूर्वीच त्यांचे लग्न कुणाशी होणार हे ठरवले जात. एकदा नातेसंबंध ठरवले की, मुले मोठी होईपर्यंत, लग्न होईपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे नाते कायमस्वरुपी राहते.