देशात दर मिनिटाला थांबतो एका शिशूचा श्वास

child death
child deathchild death

नागपूर : वैद्यकशास्त्रात दररोज नवे संशोधन पुढे येत आहे. नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. मात्र, बालमृत्यू रोखण्यात अद्याप वैद्यकशास्त्र मागे असल्याचे दिसून येते. देशात २४ तासांमध्ये ६७ हजार ३८५ बाळ जन्माला येतात. मात्र, त्याच तुलनेत दर मिनिटाला एक बाळ दगावते. असे भयावह चित्र आजही असल्याची खंत उपराजधानीतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केली.

निमित्त होते शुकवारपासून सुरू होणाऱ्या १७ व्या वार्षिक महा न्युओकॉन परिषदेचे. महाराष्ट्र, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यातील बालरोग तज्ज्ञांची ही परिषद आहे. नवजात शिशूंसंदर्भात विशेष तांत्रिक सत्र, कार्यशाळा होणार असल्याची माहिती डॉ. जयंत उपाध्ये यांनी दिली. नवजात शिशूंचे आरोग्य सांभाळण्यासाठी आगामी काळात वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधनाचे तसेच ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे, या हेतूने ही परिषद आहे. नवजात शिशूंवरील शस्त्रक्रिया, जन्मानंतर तासाभरात होणारे मृत्यू, कोरोना काळातील आरोग्य समस्या अशा विविध विषयांवर तांत्रिक सत्र होतील.

child death
...अन् पतीने फोडला हंबरडा; अपघातात गर्भवतीसह बाळाचा अंत

रविवारी सकाळी उद्धाटन

बालरोग तज्ज्ञांच्या न्युओकॉन -२०२१ परिषदेचे उद्घाटन रविवारी (ता. २४) सकाळी १० वाजता रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन होईल. दरम्यान २२ ते २४ या कालावधीत होणाऱ्या नवजात शिशूंसह बालरोगावर विशेष शोधप्रबंध सादर करण्यात येणार आहेत. परिषदेत सुमारे ५०० बालरोग तज्ज्ञ, नवजात शिशूरोग तज्ज्ञ उपस्थित राहतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com