देवा, मला आई बदलून दे; चिमुरडीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

viral
viral
Summary

लहान मुलांना जेव्हा राग येतो तेव्हा ते काय बोलतील हे सांगता येत नाही.

लहान मुलांचे अनेक मजेशीर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. निरागस अशा लहान मुलांचे हे व्हिडिओ कधी चेहऱ्यावर हसू आणतात तर कधी रडवतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लहान मुलांना जेव्हा राग येतो तेव्हा ते काय बोलतील हे सांगता येत नाही. आता जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात रागावलेली लहान मुलगी जे बोलतेय ते ऐकून आश्चर्याचा धक्काच बसेल.

लहान मुलं निरागसपणे जे बोलतात त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न अनेकदा मोठ्यांना पडतो. काहीवेळा त्यांच्या बोलण्यावर विश्वासच बसत नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, एक मुलगी पुस्तक घेऊन अभ्यास करत आहे. असं वाटतं की, तिची आई तिची शिकवणी घेत आहे किंवा तिला जबरदस्तीने शिकवत आहे.

व्हिडिओत मुलीची आई तिला होमवर्क पूर्ण करण्यासाठी सांगताना दिसत आहे. आईच्या या सांगण्यावर मुलगी असं काही उत्तर देते की तुम्हाला हसू आवरणार नाही. अभ्यासाला कंटाळलेल्या मुलीला तिची आई अभ्यास करायला सांगते. तेव्हा मुलगी चक्क देवाकडे आई बदलून देण्याची मागणी करते. ती म्हणते की, 'भगवान जी मुझे बदल के दुसरी मम्मी दे दो, कौन सी मम्मी पैदा कर दी है'

मुलीच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटलं की, यासाठी देवाला नाही तर बाबांना सांग. इन्स्टाग्रामवर रिल्सवर असे अनेक व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये लहान मुलं असे आई-बाबांसोबत दंगा मस्ती करत असताना दिसतात. नेटकऱ्यांचाही अशा व्हिडिओंना खूप प्रतिसाद मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com