हे फक्त मी माझ्या आईसाठी केलं हो...

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जुलै 2019

हे फक्त मी माझ्या आईसाठी केलं हो... त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर अधिकाऱयांनाही त्याचे आईवरील प्रेम दिसून आले. पण, हा गु्न्हा आहे.

नवी दिल्लीः आई नाष्टा करत होती. नाष्टा करत असताना आमचं स्टेशन कधी आलं समजलंही नाही. आईचा नाष्टा न संपल्यामुळे रेल्वेची चेन ओढल्यामुळे काही काळ रेल्वे थांबली. पण, चेन ओढल्यामुळे मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, हे फक्त मी माझ्या आईसाठी केलं हो...

एक आई आणि मुलगा दोघांचा रेल्वेतील प्रवास. नवी दिल्ली येथून भोपाळला जाणाऱ्या हबीबगंज शताब्दी एक्स्प्रेसमध्ये रविवारी (ता 30) ही एक वेगळीच घटना समोर आली आहे. नवी दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या मनिष अरोरा व त्याची आई रेल्वेत बसली. प्रवासादरम्यान रेल्वेतील नाष्टा त्यांनी घेतला. पण, नाष्टा संपवण्यापूर्वीच त्यांचे स्टेशन आले. पण आईचा न संपल्यामुळे मनिषने रेल्वेतील इमर्जंसी चेन खेचली आणि रेल्वे थांबवली. यामुळे रेल्वे काही वेळ मथुरा स्थानकावरच थांबेल आणि आईचा नाष्टा संपेल, हा विचार मनिषचा होता.

कोणत्याही आपात्कालिन परिस्थितीशिवाय रेल्वेची चेन चैन ओढणे कायद्याने गुन्हा आहे. रेल्वेच्या वाहतुकीमध्ये आडथळा आणल्याबद्दल मनिषला मथुरा स्थानकावरील जीआरपीने ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर रेल्वेकायदा कलम 141 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिषने आपला गुन्हा मान्य केला, पण हे आईसाठी केल्याचे म्हणणे आहे. त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर अधिकाऱयांनाही त्याचे आईवरील प्रेम दिसून आले. पण, हा गु्न्हा आहे. मनिशला जामीन मंजूर झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child pulls chain on shatabdi express for mother to finish breakfast