
मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेनं आपल्या पोटच्या दोन वर्षांच्या लेकराला नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना फरिदाबादमधल्या सैनिक कॉलनीत घडलीय. महिलेला तिचं लेकरू पांढऱ्या जीनचं अपत्य असल्याचं वाटायचं. मांत्रिकानेही तिच्या डोक्यात हेच भरवलं होतं आणि याच संशयातून तिनं २ वर्षांच्या चिमुकल्या मुलाला नाल्यात फेकून दिलं. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून पोलीस, एसडीआरएफ आणि स्थानिकांच्या मदतीने मुलाचा शोध घेतला जात आहे.