Children's Day 2020: बाल दिनानिमित्त जाणून घ्या चाचा नेहरुंचे प्रेरक विचार

jawaharlal nehru.
jawaharlal nehru.

नवी दिल्ली- Children's Day: आज संपूर्ण देश भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांचा जन्मदिवस (14 नोव्हेंबर) बाल दिन म्हणून (Children’s Day 2020 ) साजरा करतो. जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलांप्रती अतिव प्रेम होते. लहान मुले त्यांना चाचा नेहरु म्हणायचे. मुलांप्रती असलेले प्रेम, ओढ आणि त्यांच्यासाठी केलेल्या कार्यामुळे जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस (14 नोव्हेंबर) दरवर्षी बाल दिन म्हणून साजरा केला जातो. नेहरु म्हणायचे लहान मुले देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांचा प्रेम दिले जावे आणि त्यांची काळजी घेतली जावी. जेणेकरुन ते आपल्या पायावर उभे राहतील. जवाहरलाल नेहरु लहान मुलांना देशाचे निर्माते म्हणायचे. 


जवाहरलाल नेहरुंचे प्रेरक विचार-

- जो व्यक्ती पळून जातो, तो शांत बसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत अधिक संकटात सापडतो. 

- आपण अपयशी तेव्हाच होतो, जेव्हा आपण आपले आदर्श, उद्देश आणि सिद्धांताला विसरतो. 

- लोक आपल्याबाबत काय विचार करतात यापेक्षा आपण वास्तवात काय आहोत हे अधिक महत्वाचे आहे.

- महान विचार आणि छोटे लोक कधीच एकमेकांसोबत राहू शकत नाहीत. 

- ज्यांच्यात अज्ञान असते, ते नव्या बदलासाठी नक्कीच घाबरतात.

-सत्य हे सत्यच राहिल, तुम्हाला आवडो किंवा न आवडो.

- देशातील लोकांची नागरिकता, देशाच्या सेवेत सामाविष्ट असते. 

- हल्ला करणारा प्रत्येक देश म्हणत असतो की तो आपल्या रक्षणासाठी असं करत आहे.

- संकटाच्यावेळी प्रत्येक छोटी गोष्टही महत्वाची ठरू शकते. 

- कार्य प्रभावी ठरण्यासाठी लक्ष्य स्पष्ट असायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com