मुलांना बनवलं संन्यासी; जोडप्यानी स्वत:ही घेतला संन्यास, १३ वर्षापुर्वी केला होता प्रेमविवाह

13 वर्षांपूर्वी प्रेमविवाह करणाऱ्या एका जोडप्याने संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय
monkhood
monkhoodsakal

मला आयुष्याचा कंटाळा आलाय,आता संन्यास घ्यावासा वाटतो, असे मजेशीर वक्तव्ये करणारे अनेकजण असतात. पण हि वक्तव्ये तेवढ्यापुरतेच मर्यादीत असतात पण सध्या अहमदाबादच्या एका जोडप्याची चर्चा रंगली आहे.

13 वर्षांपूर्वी प्रेमविवाह करणाऱ्या एका जोडप्याने संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे आपल्या मुलांचं अनुसरण करुन त्यांनी या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतलाय. वोहराच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी संन्यासत्व स्वीकारले होते. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलयं

अहमदाबादच्या व्यापारी असलेले प्रियांक वोहरा आणि त्यांची पत्नी भव्यता वोहरा यांनीसंन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच मुलगा सुर आणि मुलगी सिरी या मुलांना जगानी फॉलो करावे, असेही त्यांनी बुधवारी आवाहन केले.

वोहराच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी संन्यासत्व स्वीकारले त्यानंतर अवघ्या चार दिवसांत ७० लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेला त्यांचा ऑटो पार्ट्सचा व्यवसाय बंद करुन या पालकांनीसुद्धा पुन्हा मुलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

“आम्ही आमच्या मुलांचे अनुसरण करत आहोत. संन्यासत्व प्राप्त केल्यानंतर इतर कोणत्याही धर्मात पालक मुलांसोबत राहू शकत नाहीत परंतु जैन धर्मात हे शक्य आहे. आम्ही त्यांच्यासोबत राहू शकू” वोहराने सांगितले. या जोडप्यांनी बुधवारी सुरतमध्ये मुलांच्या उपस्थितीत दीक्षा घेतली.

प्रियांक वोहरा यांचा भव्यता यांच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. एकमेकांच्या ते प्रेमात पडले होते. 13 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. 12 वर्षांचा असताना मला दीक्षा घेण्याची आवड होती, पण नियतीने सांगितल्याप्रमाणे, मी व्यवसायात सहभागी झाल्यानंतर आणि लग्न केल्यानंतरच हा तपस्वी मार्ग स्वीकारू शकलो. दीक्षा घेणे आम्हा चौघांच्या नशिबात लिहिलेले आहे,असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com