'पाकिस्तानपेक्षा चीनकडून भारताला जास्त धोका'| Bipin Rawat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bipin rawat

'पाकिस्तानपेक्षा चीनकडून भारताला जास्त धोका'

नवी दिल्ली: "भारताला पाकिस्तानपेक्षा (India-pakistan) चीनकडून (China) जास्त धोका आहे. जमीन किंवा खोल समुद्रात सीमारेषेवर चीनने कुठलीही आगळीक केल्यास त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत" असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Cds Bipin rawat) यांनी म्हटलं आहे. टाइम्स नाऊ समिटमध्ये गुरुवारी रावत यांना चीन नंबर एकचा शत्रू आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर 'यात तिळमात्र शंका नाही' असे उत्तर त्यांनी दिले. उत्तर सीमेवरील धोका जास्त मोठा आहे, असे त्यांनी सांगितले. "त्यांनी कुठलीही आगळीक केली, तर आम्ही तयार आहोत. गलवानसारखं त्यांनी पुन्हा काही केलं, तर मागच्यावेळेसारखंच त्यांना प्रत्युत्तर मिळेल" असे रावत म्हणाले.

हेही वाचा: अमरावती बंद : नमुना गल्लीमध्ये निघाले शस्त्र; आता तणावपूर्ण शांतता

मागच्यावर्षी १५ जूनला पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीचा त्यांनी उल्लेख केला. मागच्या दीड वर्षांपासून भारत-चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. पँगाँग टीसओ ते कैलाश रेंजमध्ये दोघांनी आपले सैन्य मागे घेतलं आहे. पण डेपसांग प्लेन आणि डेमचॉक येथे दोन्ही देशाचे सैन्य आमने-सामने आहे.

हेही वाचा: Amravati violence: चॅनल्सनी वृत्त दाखवताना, वेळ नमूद करावी - गृहमंत्री

चीनने भारतीय हद्दीत अतिक्रमण केलं आहे. डेपसांग आणि डेमचॉकमध्येही शांतता प्रस्थापित करण्याला पहिलं प्राधान्य असल्याचे रावत म्हणाले. चीनचा विश्वासघातकी स्वभाव लक्षात घेता, भारताने इथे आपली सैन्य सज्जता ठेवली आहे.

loading image
go to top