धक्कादायक! चीनने भारतात वसवलंय गाव; सॅटेलाइट फोटो आले समोर

टीम ई सकाळ
Monday, 18 January 2021

भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर वाद सुरु आहे. दरम्यान, आता अरुणाचलमध्ये नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. 

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर वाद सुरु आहे. दरम्यान, आता अरुणाचलमध्ये नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी चीनने एक गावचं वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या गावात जवळपास 101 घरं असून 1 नोव्हेंबर 2020 रोजी हे फोटो काढण्यात आले आहेत. भारताच्या प्रत्यक्ष सीमारेषेपासून तब्बल 4.5 किलोमीटर अंतर आत हे गाव आहे. 

अरुणाचल प्रदेशमधील सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या काठावर आहे. या भागावरून दोन्ही देशांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. हे ठिकाण सशस्त्र युद्धाची जागा म्हणून मार्क केलं आहे. हिमालायच्या पूर्वेकडील रांगेत असलेलं हो गाव दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या काळातच वसवण्यात आलं आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांना भीडले होते. यामध्ये भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. तर चीनने मात्र त्यांचे किती जवान यात मारले गेले हे स्पष्ट केलेलं नाही. अद्याप पूर्व लडाखचा वाद सुटलेला नाही. त्यामुळे दोन्ही देशांचे जवान सध्या दुर्गम अशा भागात थंडीच्या दिवसात सीमेवर तैनात आहेत. 

हे वाचा - ममतादीदींनी गड बदलला; भाजपच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढणार

अरुणाचलमधील दोन फोटो समोर आले आहेत. यातील एक फोटो 26 ऑगस्ट 2019 चा तर दुसरा फोटो 1 नोव्हेंबर 2020 चा आहे. यात पहिल्या फोटोत काही बांधकाम दिसत नाही. मात्र गेल्या वर्षी काढलेल्या फोटोत अनेक घरे दिसतात. परराष्ट्र मंत्रालयाला हे फोटो पाठवण्यात आले होते. याबाबत माहिती विचारली असता त्यावर सांगण्यात आले की, आम्हाला चीनकडून भारतात सीमाभागात बांधकाम केल्याची माहिती मिळत आहे. चीनने गेल्या काही वर्षात बांधकामाच्या हालचाली केल्या आहेत. सीमेवर इन्फ्रास्ट्रक्चर चांगले उभारण्यासाठी कटिबद्ध आहोत असंही सांगण्यात आलं आहे. सरकार रोड, पुल यांसह इतर इन्फ्रास्ट्रक्चरला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये सीमेवर स्थानिक जनतेकडून आवश्यक ती मदत मिळाली आहे असंही सरकारने म्हटलं. 

धक्कादायक! कोविड लस घेतल्यानंतर हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयचा मृत्यू​

ऑक्टोबर महिन्यात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होतं की,'काही काळापासून भारत सीमेवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि लष्करी कारवाया वाढवत आहेत. दोन्ही बाजूला तणाव असण्याचं कारण हेच आहे.' चीनने असे आरोप केले असले तरी भारताने मात्र अशा प्रकारचे बांधकाम चीनच्या भागात केलेलं नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china build village in arunachal pradesh sattelite photo viral