
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका सरकारी हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री 46 वर्षाच्या वॉर्ड बॉयचा मृत्यू झाला आहे
लखनऊ- Covid-19 Vaccination: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका सरकारी हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री 46 वर्षाच्या वॉर्ड बॉयचा मृत्यू झाला आहे. वॉर्ड बॉयला 24 तासांपूर्वीच कोरोनाची लस देण्यात आली होती. जिल्ह्याच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, वॉर्ड बॉयच्या मृत्यूचा आणि कोरोना लस घेतल्याचा काहीही संबंध नाही.
वॉर्ड बॉय महिपाल सिंह यांचा रविवारी छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार कोरोनाची लस घेतल्यानंतरच त्यांच्यामध्ये समस्या जाणवत होत्या. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल ते अर्णब गोस्वामींची पाकिस्तानपर्यंत चर्चा;...
मुरादाबादचे प्रमुख मेडिकल ऑफिसर एमसी गर्ग यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, महिपाल सिंह यांना शनिवारी कोरोनाची लस देण्यात आली होती. रविवारी त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती आणि छातीत दुखत होतं. त्यांनी रात्री नाईट ड्यूटीपण केली होती. तोपर्यंत त्यांच्यात कोणतीही समस्या नव्हती. त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्टच्या हवाल्याने सांगितलं की, त्यांचा मृत्यू 'cardio-pulmonary disease'मुळे 'cardiogenic shock/septicemic shock'ने झाला आहे. त्यांच्या मृत्यूचा लशीशी कोणताही संबंध नाही.
Gram Panchayat Results : चंद्रकांत पाटलांचा होम पिचवर पराभव, पराभवावर आदित्य...
वॉर्ड बॉयचा मुलगा विशाल याने मीडियाला सांगितलं की, वडिलांना सुरुवातीपासून काही समस्या असतील, पण लस घेतल्यानंतर त्यांना जास्त त्रास जाणवू लागला. ते लस सेंटरमधून दुपारी 1.30 वाजता निघाले होते. त्यांना मी घरी घेऊन आलो. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यांना निमोनिया, खोकला आणि सर्दी होती, पण लस घेतल्यानंतर त्यांची तब्येत अधिक बिघडली.
दरम्यान, देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 22,643 लोकांना कोविड लस देण्यात आली आहे. राज्यातील लसीकरणाचे पहिले चरण 22 जानेवारीला पूर्ण केले जाईल. गेल्या 16 जानेवारीपासून देशात लसीकरणास सुरवात झाली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या दिवसी म्हणजे रविवारी देशात 17 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. रविवारी सहा राज्यांमध्ये 500 हून अधिक केंद्रावर लसीकरणाची ही मोहिम पार पडली.