काश्मीरप्रश्नी 54 वर्षांनंतर पहिल्यांदाच युएनमध्ये आज बैठक

China Calls For closed door Meeting Of UN Security Council To Discuss Kashmir article 370 Issue
China Calls For closed door Meeting Of UN Security Council To Discuss Kashmir article 370 Issue

संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीची (UNSC) काश्मीर प्रश्नावर चर्चेसाठी आज‌ बैठक होत आहे.‌ गेल्या 54 वर्षांत केवळ‌ काश्मीर‌प्रश्नावर ‌बैठक‌ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जम्मू-काश्मीरमधील वादग्रस्त 370 कलम रद्द करण्याचा निर्णय भारतीय संसदेने घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड राजकीय अस्वस्थता आहे.

पाकिस्तानला‌ पाठिंबा देणाऱया चीनने या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता बैठक होईल. यापूर्वी‌ 1965 मध्ये युएनएससीची काश्मीरबद्दल बैठक झाली होती. 

आजची बैठक बंद‌ दरवाजाआड होईल. बैठकीचा वापर पाकिस्तान भारतविरोधी जनमत तयार करण्यासाठी करेल हे स्वाभाविक आहे.‌ ही बैठक पूर्ण सुरक्षा समितीची बैठक नाही.‌ पूर्ण बैठकीआधी चर्चेचे स्वरूप ठरविण्यासाठी ही बैठक होत आहे. अलीकडील काळात समितीने अशा स्वरूपाच्या बैठकांवर भर दिला आहे, असे‌ एका राजनैतिक अधिकाऱयाने सांगितले.

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा भारताकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्यासाठी पाकिस्ताननं हरतऱ्हेचे प्रयत्न केले. काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानं आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानं दहशतवादाचा अजेंडा राबवणं कठीण जाईल असं पाकिस्तानला वाटतं. त्यामुळेच चीनच्या मदतीनं काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू होते. अखेर चीननं याबद्दल बैठक घेण्याची मागणी केली. त्यामुळे आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीर प्रश्नावर बंद खोलीत चर्चा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com