esakal | चीनकडून भारतीय विमानाला जाणीवपूर्वक दिरंगाई 
sakal

बोलून बातमी शोधा

चीनकडून भारतीय विमानाला जाणीवपूर्वक दिरंगाई 

कोरोना विषाणूने पीडितांसाठी मदत साहित्य पोचविण्यासाठी आणि वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारतीय वायुसेनेची विमाने सज्ज असून, या विमानांना चीनमध्ये प्रवेश देण्याची परवानगी देण्यासाठी चीन जाणून-बुजून दिरंगाई करत असल्याचा आरोप भारताने शनिवारी केला आहे. 

चीनकडून भारतीय विमानाला जाणीवपूर्वक दिरंगाई 

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - कोरोना विषाणूने पीडितांसाठी मदत साहित्य पोचविण्यासाठी आणि वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारतीय वायुसेनेची विमाने सज्ज असून, या विमानांना चीनमध्ये प्रवेश देण्याची परवानगी देण्यासाठी चीन जाणून-बुजून दिरंगाई करत असल्याचा आरोप भारताने शनिवारी केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

चीनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, या विषाणूमुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक देशाने आपापल्या नागरिकांना चीनमधून बाहेर काढण्याची घोषणा करत आपल्या नागरिकांना परत आणले आहे. त्याचप्रमाणे भारतानेही आपल्या नागरिकांना परत आणले होते. मात्र, अद्यापही चीनच्या वुहानमध्ये १०० भारतीय नागरिक अडकले असल्याचे समोर आले आहे. त्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यास चीनकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना वापस आणण्यासाठी भारतीय हवाई दलालाचे सी-१७ हे विमान २० फेब्रुवारीला जाणार होते. मात्र, चीनने परवानगी न दिल्यामुळे विमान पाठविण्यात आले नसल्याची माहिती शनिवारी अधिकृत सूत्रांनी दिली. 

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जपान, युक्रेन आणि फ्रान्स या देशांना १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान चीनमधून आपल्या नागरिकांना वापस नेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु, चीनने अजूनपर्यंत भारताच्या विनंतीस मान्यता दिलेली नाही. यासंबंधी चीन दूतावासाच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वुहानला जाण्यासाठी भारतीय विमानास परवानगी देण्यास जाणीवपूर्वक उशीर झालेला नाही. दोन्ही देशांचे अधिकारी यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले आहे. 

कोरोनामुळे दोन हजार ३४५ जणांचा मृत्यू 
चीनमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ हजार ३४५ झाली आहे. तर, ७६ हजार २८८ नागरिकांना या विषाणूची लागण झाली असल्याचे चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये भीतीचे वातावरण आहे. चीनमध्ये इतर देशांचे अनेक नागरिक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न सुरू आहेत.