डोकलामजवळील गावे खाली करण्याचे आदेश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

डोकलामपासून 35 किमी अंतरावरील नाथांग गावातील शेकडो नागरिकांना तातडीने गावातून निघून जाण्यास सांगण्यात आले आहे. सुकनाहून डोकलामला जात असलेल्या हजारो सैनिकांच्या सोयीसाठी अथवा युद्ध झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा आदेश दिला आहे का, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही

नवी दिल्ली - डोकलामजवळील गावे मोकळी करण्याचे आदेश भारतीय लष्कराने नागरिकांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या माहितीनुसार, डोकलामपासून 35 किमी अंतरावरील नाथांग गावातील शेकडो नागरिकांना तातडीने गावातून निघून जाण्यास सांगण्यात आले आहे. सुकनाहून डोकलामला जात असलेल्या हजारो सैनिकांच्या सोयीसाठी अथवा युद्ध झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा आदेश दिला आहे का, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. जवानांच्या या हालचालीबाबत लष्कराने काहीही माहिती दिली नसली, तरी हा नियमित सरावाचा भाग असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Web Title: china doklam india