esakal | पँगोंगमध्ये मार खाल्ल्यानंतर चीनने 'अक्साई चीन'कडे वळवला मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Aksai_Chin

चिनी सैन्याविरुध्द भारताने आपली स्पेशल फोर्सेस मैदानात उतरवली आहे. पँगोंग तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर चीनला धूळ चारण्यामध्ये स्पेशल फ्रंटियर फोर्सने विशेष भूमिका बजावली होती.

पँगोंगमध्ये मार खाल्ल्यानंतर चीनने 'अक्साई चीन'कडे वळवला मोर्चा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रत्यक्ष ताबा रेषा (एलएसी) सुरक्षित ठेवण्यासाठी भारतानेही पावले उचलली आहेत. पँगोंग तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावर तोंडावर पडलेला चीन सूड उगवण्याच्या तयारीत आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) चुशुल सेक्टरमध्ये आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या व्यतिरिक्त आता त्यांचे लक्ष अक्साई चीन परिसराकडे असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांत तेथील पीएलए एअरफोर्सची हालचाल टिपण्यात आली. प्रत्युत्तरादाखल भारताने अतिरिक्त सैन्य, शस्त्रे, दारुगोळा गोळा केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनची हालचाल पाहून भारताने आपला वेग बदलला
चिनी सैन्याच्या हालचाली पाहता भारतीय सैन्यानेदेखील त्या अनुषंगाने आपला वेग वाढवला आहे. ज्या ठिकाणी चिनी सैन्य ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकते, अशा ठिकाणी सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात येत आहे. हिंदुस्तान टाईम्सने एका वरिष्ठ सेना अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, ''लडाखमधील चिनी सैन्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आळा घालण्यासाठी भारतीय सैन्य आता 'सिक्योर बॉर्डर मोड'मध्ये आहे. चीनची आक्रमकता पाहता भारतीय सैन्यानेही आपला वेग बदलला आहे."

बाजारात आली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी साडी; पाहा किंमत​

देप्सांग आणि चुमूरवर लक्ष केंद्रित
देप्सांगच्या मैदानाजवळ चिनी सैन्यांची उपस्थिती पाहता भारतीय सैन्याने विशेष तुकडी तैनात केली आहे. चुमूरमध्येही पीएलएच्या विरोधात एक विशेष तुकडी पाठविली गेली आहे, यामुळे चिनी सैन्याला हा संदेश देण्यात आला की, भारत एक इंच जमीन देण्यास तयार नाही. डेमचॉक आणि चुमूर भागावर भारताची मजबूत पकड आहे. या ठिकाणावरून ल्हासा-काशगर महामार्गावर लक्ष्य ठेवणे सोपे जाते. आणि हाच महामार्ग पीएलएच्या रसद पुरवठ्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.

चिनी सैन्याविरुध्द भारताने आपली स्पेशल फोर्सेस मैदानात उतरवली आहे. पँगोंग तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर चीनला धूळ चारण्यामध्ये स्पेशल फ्रंटियर फोर्सने विशेष भूमिका बजावली होती. चुशूलमध्ये चीनने जराही हालचाल करण्याचा प्रयत्न केला, तर चीनला एक अत्यंत कठीण आव्हानाला सामोरे जावे लागेल.

चीनला झटका; ‘फिंगर चार’वरील महत्त्वाची ठिकाणे ताब्यात​

ऑन द स्पॉट होताहेत निर्णय 
पँगोंग लेकजवळ झालेल्या चकमकीसाठी चीनने भारताला दोषी ठरवले आहे. तर भारताने आधीच स्पष्टपणे सांगितले की, चीनच्या सैन्याने पुढे सरकताना पाहून भारताने आधीच उंचीवरील ठिकाणे ताब्यात घेतली होती. मुत्सद्दी आणि लष्करी पातळीवर वाटाघाटी करूनही चीन एलएसीवरील आपला हक्क सोडण्यास तयार नाही. प्रत्येक परिस्थितीसाठी भारताने स्वत:ला तयार केले आहे. आता मुख्यालय स्तरावर नव्हे, तर घटनास्थळी (ऑन द स्पॉट) निर्णय घेण्यात येत आहेत.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image