लेहमध्ये चीनची घुसखोरी

पीटीआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

लेह/ नवी दिल्ली - चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) भारत सरकार "मनरेगा'अंतर्गत उभारत असलेल्या कालव्याच्या परिसरामध्ये घुसखोरी करत हे काम थांबविल्याने उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. लेहच्या पूर्व भागामध्ये अडीचशे किलोमीटर अंतरावर देमचोक सेक्‍टरमध्ये भारताकडून हे काम सुरू होते, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

चीनच्या सैनिकांनी बुधवारी या कामामध्ये हस्तक्षेप करत ते रोखून धरले. या वेळी घटनास्थळी 55 चिनी सैनिक आले होते. यानंतर लष्कर आणि भारत-तिबेट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वादग्रस्त भागामध्ये अशा प्रकारचे काम सुरू करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्‍यक असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला. दरम्यान, उभय देशांदरम्यान झालेल्या करारान्वये केवळ संरक्षणाच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या बांधकामांच्या माहितीची आदानप्रदान केली जाणे बंधनकारक आहे. चिनी लष्कराच्या आक्रमक भूमिकेला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर देत एक इंचदेखील त्यांना आपल्या हद्दीतून पुढे येऊ दिले नाही. तत्पूर्वी दोन वर्षांपूर्वी चीनने अशाच प्रकारे भारताच्या हद्दीमध्ये घुसखोरी करत बांधकाम रोखून धरले होते.

Web Title: China Infiltration in Leh