कोर कंमाडर स्तरावरील बैठकीसाठी चीन तयार; सीमा वादावर तोडगा निघणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China and India
कोर कंमाडर स्तरावरील बैठकीसाठी चीन तयार; सीमा वादावर तोडगा निघणार?

कोर कंमाडर स्तरावरील बैठकीसाठी चीन तयार

sakal_logo
By
सुधीर काकडे

दिल्ली: भारत आणि चीनमध्ये (China and India) सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमिवर गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढतााना दिसतो आहे. त्यातच अलीकडे चीनने भारताच्या हद्दीत वस्ती वसवल्याचं सुद्धा काही सॅटेलाईट फोटोमधून समोर आलंय. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता एक सकारात्माक महिती समोर आली आहे. त्यानुसार भारत आणि चीन दरम्यानची थांबलेली कॉर्प्स कमांडर स्तरावरील थांबलेल्या बैठकीच्या फेऱ्या पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: चीनबद्दल मोदी मौन कधी सोडणार?

पूर्व लडाखमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी वरिष्ठ कमांडर्समधील लष्करी चर्चेची 14 वी फेरी लवकरात लवकर व्हावी यावर भारत आणि चीन सहमत झाले आहेत. भारताने नेहमीच शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी, चीनकडून अनेकदा कुरघोड्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यातच नुकतेच काही फोटो समोर आले असून, यात अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने लष्करी छावणी वसवल्याचं दिसतं आहे. हे फोटो खरे असल्याचा दावा केला जात असतानाच अमेरिकेने देखील असेच काहीसे फोटो समोर आणले होते.

हेही वाचा: भूतानच्या सीमेवर चीनने वसवली चार गावे; सॅटेलाइट फोटोंच्या अभ्यासातून उघड

loading image
go to top