esakal | धक्कादायक! ई-कॉमर्ससह भारताच्या न्यायव्यवस्थेवर चीनचे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

china india

देशामध्ये उभ्या राहत असलेल्या नव्या स्टार्टअप अर्थकारणावर चीनने पाळत ठेवल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

धक्कादायक! ई-कॉमर्ससह भारताच्या न्यायव्यवस्थेवर चीनचे लक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - देशामध्ये उभ्या राहत असलेल्या नव्या स्टार्टअप अर्थकारणावर चीनने पाळत ठेवल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशीप करणाऱ्या साध्या कंपनीतील अभियंत्यापासून ते अझीम प्रेमजी यांच्यासारखे बडे उद्योगपती आणि त्यांच्या कंपन्यांसंबंधीचा डेटा चिनी कंपनीने गोळा केल्याचे आढळून आले आहे. हायब्रिड वॉरफेअरचा वापर करून चीन शत्रू राष्ट्रांविरोधात कुरापती करत आहे.

देशातील बड्या टेक स्टार्टअपपासून ते पेमेंट सेवा आणि आरोग्यक्षेत्रातील अॅप्सवर चीनची बारीक नजर असल्याचे आढळून आले आहे. चिनी कंपनी शिन्हुआ डेटाने ओव्हरसीज की इंडिव्हिज्युअल डेटाबेसच्या माध्यमातून ही हेरगिरी केल्याचे एका इंग्रजी वर्तमानपत्राने केलेल्या स्टींग ऑपरेशनमधून उघड झाले आहे. देशातील ई-कॉमर्सचे जाळे आणि नव्याने उभ्या राहत असलेल्या आणि विविध ठिकाणांवर गुंतवणूक करत असलेल्या भारतीय कंपन्या आणि नवे उद्योजक हे चिनी कंपनीच्या रडारवर असल्याचे आढळून आले आहे.

हे वाचा - Hybrid Warfare - भारतीय नेत्यांवर चीनची करडी नजर; शस्त्रांशिवाय युद्ध जिंकण्याची रणनिती

न्यायव्यवस्थेवर लक्ष
सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीशांप्रमाणेच सनदी सेवांमध्ये काम करणाऱ्या बड्या नोकरशहांची माहिती ओव्हरसीज की इन्फॉर्मेशन डाटाबेसने गोळा केल्याचे आढळून आले आहे. यामध्ये विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एम. खानविलकर, राजस्थान उच्च न्यायालयामध्ये काम करणारे संदीप मेहता अशा दिग्गज मंडळींची चीनने माहिती गोळा केल्याचे उघड झाले आहे. देशातील तब्बल तीस बड्या न्यायाधीशांची यादीच चिनी कंपनीने तयार केली आहे.बड्या नोकरशहांवर देखील चीनने पाळत ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

हायब्रिड वॉरफेअर काय आहे?
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने 1999 च्या सुरुवातील हायब्रिड वॉरफेअर साठी एक रणनिती आखली. याअंतर्गंत हिंसाचार ही बाब लष्करापासून नेते, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या दुनियेमध्ये आणायाची होती. या नव्या युद्धाचे मास्टरमाइंड चीनचे कर्नल कीआओ लिआंग आणि कर्नल वांग शिआंगसूई हे होते. हायब्रिड वॉरफेअरच्या माध्यमातून चीन शत्रू राष्ट्रात समाजात तेढ निर्माण करणं, आर्थिक विकासात अडथळा निर्माण करणं, संस्थांची लूट करणं, राजकीय नेतृत्व आणि त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून प्रतिमा खराब करणं या गोष्टी केल्या जात आहेत. अशाच प्रकारे रशिया क्रीमियामध्ये हायब्रिड वॉरफेअरचा वापर करत आहे. मात्र चिनच्या तुलनेत रशिया कमी प्रमाणात या बाबी करत आहे. चीनने हाँगकाँगमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला.