
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी लिहिलेल्या गोपनीय पत्रामुळे भारत- चीन संबंधांतील कटुता दूर होऊन सौहार्द निर्माण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या तियानजीन येथे होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने केला आहे.