भारतावर चिनी बँकेचे तब्बल 9 हजार कोटींचं कर्ज; गलवान संघर्षानंतर झाला होता करार

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 16 September 2020

15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांदरम्यान झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते.

नवी दिल्ली- 15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांदरम्यान झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यानंतर देशात चीनविरोधात मोठा असंतोष उफाळून आला होता. त्यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर पाच दिवसांनी म्हणजे 19 जूनला भारत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी  Pradhan Mantri Garib Kalyan Yojana (PMGKY) एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून Asian Infrastructure Investment Bank (AIIB) 5,521 कोटी रुपयांच्या कर्जचा करार केला आहे. विशेष म्हणजे बिंजिग स्थित असलेल्या या बँकेत सर्वाधिक भागिदारी चीनची असल्याचे द टेलिग्राफ या वृत्त संस्थेने सांगितले आहे. 

देशातील या सहा कंपन्यांची विक्री होणार; अनुराग ठाकूर यांनी दिले संकेत

गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारताने चीनविरोधात आक्रमकणा दाखवला होता. भारताने 29 जून रोजी चिनी कंपनीच्या 59 अॅप्सवर बंदी आणली होती. चीनच्या ताब्यात असलेल्या बँकेकडून दोन  (9,202 कोटी रुपयांचे) कर्ज  घेतले असल्याचे मोदी सरकारने मान्य केले आहे. हे कर्ज उभय देशांमध्ये तणाव असताना घेण्यात आली आहेत. भारत सरकार एकीकडे कारवाई म्हणून चिनी अॅप्सवर बंदी आणत होते, तर दुसरेकडे देशातील कोरोना स्थिती हाताळण्यासाठी चिनी बँकेकडून कर्ज घेत होते, अशी टीका केली जात आहे. 

19 जून रोजी भारताने चीनसोबत  5,521 कोटी रुपयांच्या कर्जाचा करार केला होता. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मदत मिळावी, यासाठी हे कर्ज घेण्यात आले होते. 2016 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. याअंतर्गत गरिबांसाठी मदत जाहीर केली जाते.  8 मे रोजी जेव्हा पहिल्यांदा चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नाची बातमी आली होती, यादरम्यान भारत सरकारने 3677 कोटी रुपयांचे कर्ज एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून घेतले होते. चीनच्या ताब्यात असलेल्या बँकेकडून कर्ज घेतल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. 

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लिखित स्वरुपात संसदेत याची माहिती दिली आहे. भारत सरकारने एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून दोनवेळा कर्ज घेतले आहे. कोरोना संकटात मदत मिळावी म्हणून हे कर्ज घेण्यात आले आहे. पहिले कर्ज 8 मेला घेण्यात आले होते. त्यानंतर 19 जून रोजी दुसरे कर्ज घेण्यात आले होते. देशाची आरोग्य व्यवस्था आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी मदत मिळावी यासाठी हे कर्ज घेण्यात आले असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ज्यांना मदत करण्यासाठी आली, त्यांना या कर्जातून पैसे देण्यात आले. 

सुगा झाले पंतप्रधान; PM मोदींनी जपानी भाषेत दिल्या शुभेच्छा!

एआयआयबी बँकेवर चीनचे प्रभुत्व

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँके बहुपक्षीय आहेत. आशियातील सामाजिक आणि आर्थिक सुधारणेसाठी ही बँक प्रयत्न करते. या बँकेचे कार्य 2016 पासून सुरु झाले होते. या बँकेचे 103 सदस्य आहेत. भारत या बँकेचा संस्थापक सदस्य आहे. एआयआयबी बँकेची सर्वाधिक भागिदारी (26.61 टक्के) चीनकडे असून भारताकडे  7.6 टक्के भागिदारी आहे.  एआयआयबी बँकेवर चीनचे प्रभुत्व आहे.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese bank owes Rs 9202 crore to India