बिहारच्या सीमावर्ती गावांत चिनी नभोवाणीचे कार्यक्रम

बिहारच्या सीमावर्ती गावांत चिनी नभोवाणीचे कार्यक्रम

पाटणा - नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारमधील गावांमध्ये चीनच्या एफएम नभोवाणीचे कार्यक्रम ऐकू येऊ लागले आहेत. स्थानिकांना चिनी भाषा समजत नसली, तरी ते हे कार्यक्रम मात्र ऐकवत बसतात! केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत मोतिहारीतील दूरदर्शन केंद्राकडून अहवाल मागविला असून, तो पाठविण्यात आला आहे.

नेपाळला लागून असलेल्या बिहारी गावांमध्ये नेपाळमधून प्रसारित होणारे एफएम नभोवाणीचे कार्यक्रम आधीपासूनच ऐकू येतात. आता त्यात चिनी नभोवाणीची भर पडल्याची दखल गृह मंत्रालयाने घेतली आहे. पूर्व चंपारण्य जिल्ह्यातील आदापूर, छौडदानो आणि लखोरा या परिसरातील सुमारे १२-१५ गावांत हे चिनी एफएम कार्यक्रम ऐकू येतात. आम्हाला ही भाषा समजत नसली, तरी आम्ही हे कार्यक्रम ऐकतो, असे स्थानिक नागरिक सांगतात.

तंत्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनमधून प्रसारित केल्या जाणाऱ्या एफएमची फ्रिक्वेन्सी उच्च दर्जाची आहे आणि त्याचा रिले टॉवर बराच उंच आहे. त्यामुळे सीमेवरील गावांमध्ये प्रक्षेपण ऐकू येते. चिनी कार्यक्रमांचे प्रक्षेपण रोखण्याचे तंत्रज्ञान नेपाळकडे नाही. भारत-चीनदरम्यानचे तणावाचे संबंध पाहता; हे प्रक्षेपण सामरिक आणि राजकीयदृष्ट्या धोक्‍याचे असल्याचे अभ्यासकांना वाटते. पूर्वी नेपाळच्या भूमीवरून चिनी उत्पादने भारतात येत होती, याकडे हे तज्ज्ञ लक्ष वेधतात.

नेपाळी नभोवाणी लोकप्रिय
बिहारच्या रक्‍सौल आणि मोतिहारी या जिल्ह्यांतील गावांमध्ये नेपाळी नभोवाणीचे कार्यक्रम लोकप्रिय आहेत. असे सहा कार्यक्रम नेपाळ प्रक्षेपित करतो. नेपाळी नभोवाणीच्या दोन वाहिन्या केवळ भोजपुरी भाषेतील गाणी आणि कार्यक्रमांचे प्रक्षेपण करतात. नेपाळच्या एफएमवरून भारताबाबतच्या बातम्याही दिल्या जातात. सीमेवरील काही गावांत नेपाळी भाषा बोलली जाते आणि बऱ्याच जणांना ती समजतेसुद्धा. त्यामुळ नेपाळी नभोवाणीचे कार्यक्रम नागरिक आवडीने ऐकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com