चीनचे परराष्ट्र मंत्री अचानकच आलेत भारतात; उद्या घेणार जयशंकर यांची भेट

चीनचे परराष्ट्र मंत्री अचानकच आलेत भारतात; उद्या घेणार जयशंकर यांची भेट

नवी दिल्ली : सीमावादावरून भारत चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असताना चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी आज भारत दौऱ्यावर दिल्लीत दाखल झाले आहेत. वांग यी यांची उद्या शुक्रवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासमवेत उच्चस्तरीय चर्चा असल्याचं समजतंय. याबाबतचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. (Chinese Foreign Minister Wang Yi)

चीनचे परराष्ट्र मंत्री अचानकच आलेत भारतात; उद्या घेणार जयशंकर यांची भेट
रेल्वेच्या खासगीकरणाचा कसलाही विचार नाही; मोदी सरकारने केलं स्पष्ट

पाकिस्तानातील ओआयसी परिषदेमधील सहभाग आणि अनपेक्षितपणे काबूल दौरा करून तालिबान सरकारशी प्रथम औपचारिक चर्चा करणारे चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी हे चीनच्या सरकारी विमानाने दिल्लीत दाखल झाल्याचा दावा फ्लाईट ट्रॅकर्सतर्फे करण्यात आला. मात्र, दोन्ही बाजूंकडून यावर कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नव्हता. काही दिवसांपासून या प्रस्तावित दौऱ्याबद्दल सरकारी पातळीवर चर्चा सुरू असली तरी सर्वोच्च राजकीय पातळीवरून निर्णय झाल्याखेरीज काहीही सांगता येणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सूचकपणे म्हटले होते. सीमावादावर उभयमान्य तोडगा शोधण्यासाठी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक त्याचप्रमाणे लष्करी पातळीवरील वाटाघाटींच्या १४ फेऱ्याही झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चिनी परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत दौऱ्याविषयीची चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्रमंत्री भारतात दाखल झाले आहेत.

चीनचे परराष्ट्र मंत्री अचानकच आलेत भारतात; उद्या घेणार जयशंकर यांची भेट
उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा, मुख्यमंत्री धामींची मोठी घोषणा

चीनकडून या दौऱ्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी भारतीय परराष्ट्र मंत्रालयातर्फे याबाबत जाहीर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. त्यातच, पाकिस्तानातील ओआयसी परिषदेला हजेरी लावताना परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी जम्मू काश्मीरबाबत वादग्रस्त विधान केल्याने भारतात याची संतप्त प्रतिक्रिया उमटली. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसण्याचा चीनला अधिकार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आज ठणकावले. एवढेच नव्हे तर भारत इतर देशांच्या अंतर्गत मुद्द्यांवर बोलण्याचे टाळतो, असा सूचक इशाराही देण्यात आला. या घटनेला काही तास उलटण्याच्या आत वांग यी यांचे भारतात पोचणे हा भारताशी संबंध सुरळीत करण्याचा हा चीनचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. चिनी परराष्ट्र मंत्र्यांची उद्या भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासमवेत चर्चा अपेक्षित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com