esakal | चीनी सैनिक धारदार शस्त्रे घेऊन सीमेवर उभे
sakal

बोलून बातमी शोधा

chinese soldiers armed with stick machetes during their deployment along the lac

भारत-चीन सीमेवर चीनचे सैनिक धारदार शस्त्रे घेऊन उभे असल्याचे छायाचित्र समोर आले आहे. या छायाचित्रावरून चीनी सैनिक 15 जून प्रमाणेच संघर्षाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

चीनी सैनिक धारदार शस्त्रे घेऊन सीमेवर उभे

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः भारत-चीन सीमेवर चीनचे सैनिक धारदार शस्त्रे घेऊन उभे असल्याचे छायाचित्र समोर आले आहे. या छायाचित्रावरून चीनी सैनिक 15 जून प्रमाणेच संघर्षाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

Video: पाकची युवती म्हणतेय; ट्रम्पच माझे बाबा...

छायाचित्रामध्ये 25-30 चीनी सैनिक चाकू आणि भाल्यासोबत उभे असल्याचे दिसत आहे. शिवाय, त्यांच्याकडे रायफली पण दिसत आहेत. पेंगोंग भागातील उंचीवर ठिकाणांवर भारतीय जवानांनी ताबा मिळवल्यानंतर चीनी सैनिक भारतीय पोस्टच्या जवळ येण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांकडून सीमेवर सैनिकांकडून गोळीबार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. लडाखमध्ये पेंगोंग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील भारतीय सैन्य तैनात असलेल्या ठिकाणी जवळ येण्याचा चीनी सैनिकांचा प्रयत्न फसला होता. आता भाले आणि बंदुका असलेल्या चीनी सैनिकांचे फोटो समोर आले आहेत. या फोटोवरून लक्षात येते की चीनी सैन्य 15 जून प्रमाणेच संघर्षाच्या तयारीत होते. चीनी सैन्याकडून शस्त्रांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे हे पहिले स्पष्ट पुरावे आहेत. सोमवारी भारताच्या नियंत्रणात असलेल्या पर्वतांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य शूटिंग रेंजमध्ये होत्या. मुखपारीजवळ चीनी सैनिक भारतीय पोजिशनच्या जवळ पोहचल्यावर भारतीय जवानांनी त्यांना रोखले होते. यावेळी चीनी सैनिकांनी हवेत गोळीबार करत धारदार शस्त्रे दाखवली होती. संबंधित छायाचित्र रेंजांगा ला आणि मुखपारी या भागातील आहे.

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत चीनने पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत चक्क गोळीबार केल्याने ताबा रेषेवर अभूतपूर्व असा तणाव निर्माण झाला आहे. तब्बल ४५ वर्षांनंतर या भागांमध्ये चिनी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. दक्षिण पॅंगाँग सरोवराच्या भागात भारतीय लष्कराच्या या आक्रमक कारवाईमुळे बिथरलेल्या चीनने या घटनेनंतर नेहमीप्रमाणे कांगावा सुरू केला आहे. भारतीय सैन्याने चिनी हद्दीत घुसखोरी करून गस्तीपथकाला रोखण्यासाठी केलेला गोळीबार म्हणजे उघडउघड चिथावणी असल्याचा आरोप चीनकडून करण्यात आला आहे. मात्र, भारताने हा चिनी कांगावा धुडकावून लावला आहे.

मोबाईल चोरलाय पण वापरता येत नाही; येता का...

भारतीय सैन्याने ताबारेषाही ओलांडलेली नाही आणि गोळीबारही केलेला नाही, असे स्पष्ट शब्दांत भारताने चीनला ठणकावले आहे. तसेच चीनकडूनच चिथावणीखोर कारवाया सुरू असल्याचेही सुनावण्यात आले. या आरोप प्रत्यारोपांमुळे भारत-चीनदरम्यानचा तणाव गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १०) परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांची मॉस्को येथे होणारी बैठक निर्णायक ठरणार आहे.

loading image