चीनी लशीत डुकराचे मांस असल्याने ती मुस्लिमांसाठी निषिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Vaccine

कोरोनाच्या लशीची भारताला प्रतीक्षा असताना चीनच्या लशीला मुंबईच्या रझा अकादमीच्या सुन्नी मुस्लिम विद्वानांनी विरोध दर्शविला आहे. चीनी लशीत डुकराचे मांस असल्याने ती मुस्लिमांसाठी निषिद्ध असल्याचे त्यांनी जाहीर केले.

चीनी लशीत डुकराचे मांस असल्याने ती मुस्लिमांसाठी निषिद्ध

नवी दिल्ली - कोरोनाच्या लशीची भारताला प्रतीक्षा असताना चीनच्या लशीला मुंबईच्या रझा अकादमीच्या सुन्नी मुस्लिम विद्वानांनी विरोध दर्शविला आहे. चीनी लशीत डुकराचे मांस असल्याने ती मुस्लिमांसाठी निषिद्ध असल्याचे त्यांनी जाहीर केले.

नव्या वर्षापासून गाड्यांना FASTag बंधनकारक; नितीन गडकरींची घोषणा

कोरोनावर चीनमध्ये तयार होत असलेल्या लशीत डुकराचे मांस असल्याचे वृत्त आल्यानंतर रझा अकादमीने ही लस वापरण्यास विरोध केला आहे. अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात डुकराच्या मासांचे अंश असलेली चिनी लशीच्या खरेदीसाठी नोंदणी करू नये, असे आवाहन भारत सरकारला केले आहे. ज्या लशींची मागणी नोंदविली आहे, त्यातील घटकांची यादी सरकारने आम्हाला दाखवावी. म्हणजे त्याच्या वापराबद्दल घोषणा करता येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, अमेरिकेत तयार होत असलेल्या कोरोनावरील लशीत गाईच्या रक्ताचा समावेश असल्याने  ती भारतात वापरू नये, असे आवाहन अखिल भारत हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनीही केले आहे. हिंदू धर्म नष्ट करण्याचा हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा आरोप करीत ते म्हणाले की, गाईचे शेण व गोमूत्रापासून तयार केलेले औषध व लशीचा वापर हिंदू करू शकतात. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी लस विकासाची प्रक्रिया जाहीर करावी, म्हणजे लोकांचा धर्म बुडणार नाही.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top