
निवडणुकीत पक्षाला 24 लाख मते म्हणजेच सुमारे 6 टक्के मते मिळाली आहेत. यातून लोजपाचा विस्तार झाल्याचे स्पष्ट दिसते. बिहारमध्ये पक्षाने 'बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट' बरोबर कोणताच समझोता केलेला नाही.
पाटणा- लोक जनशक्ती पार्टीचा (लोजपा) शनिवारी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. पक्षाच्या स्थापनेदिवशी लोजपाप्रमुख चिराग पासवान यांनी पक्ष कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पप्पा (रामविलास पासवान) आता आपल्यात नाहीत. त्यामुळे आपल्या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या गैरहजेरीत पक्षाने बिहार विधानसभा निवडणूक लढवली. निवडणुकीत पक्षाला 24 लाख मते म्हणजेच सुमारे 6 टक्के मते मिळाली आहेत. यातून लोजपाचा विस्तार झाल्याचे स्पष्ट दिसते. बिहारमध्ये पक्षाने 'बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट' बरोबर कोणताच समझोता केलेला नाही.
चिराग पासवान पुढे म्हणाले की, नवीन लोक जोडले गेल्याने पक्ष मजबूत झाला आहे. निवडणुकीपूर्वी पक्षाकडे दोन पर्याय होते. 15 जागांवर निवडणूक लढवावी किंवा मैत्रीपूर्ण निवडणूक लढवावी. युतीमध्ये पक्षाला केवळ 15 जागा देण्यावर चर्चा सुरु होती. लोजपाच्या संसदीय समितीने हे मान्य केले नाही. त्यामुळे बहुतांश जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
28 नवम्बर 2000 को पार्टी की स्थापना आदरणीय राम विलास पासवान जी ने अपने राष्ट्रवादी सोच के साथ लोक जनशक्ति पार्टी का निर्माण किया था।मुझे गर्व है की पार्टी ने हमेशा राष्ट्रहित से प्रेरित होकर सभी जाति धर्म के साथ काम किया और समाज को एक कर रखने में अहम भूमिका निभाई। pic.twitter.com/sdjDWVDQCK
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) November 28, 2020
हेही वाचा- मोदींच्या अहंकारामुळे जवान शेतकऱ्यांविरोधात उभा राहिले, राहुल गांधींचा हल्लाबोल
ते पुढे म्हणाले की, बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट संकल्पाबरोबर आपण एकट्याने 135 जागा लढवल्या होत्या. बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट या आपल्या अभियानाचे कौतुक करण्यात आले. आता आपल्याला आणखी तयारी करावी लागेल.
पक्षाचे संस्थापक आदरणीय रामविलास पासवान यांनी मागील वर्षी पक्षाचे अध्यक्षपद माझ्याकडे सोपवले होते. त्यांनी आपला पक्ष मजबूत करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांना नेहमीच कोणाशी युती न करता पक्षाने एकट्याने निवडणूक लढवावी असे वाटत असत. 2020 च्या निवडणुकीने हे सिद्ध केले आहे की, लोजपाकडे एक मजबूत जनाधार आहे. त्याच्या आधारेच पुढील निवडणुकांमध्ये पक्ष एका नव्या उंचीवर जाईल.
हेही वाचा- 'इंदिरांना मारलं तर मोदी काय चीज?', शेतकरी आंदोलनात खलिस्तानींच्या घोषणेचा खट्टर यांचा दावा
बिहार विधानसभा निवडणुका 2025 पूर्वीही होऊ शकतात. सर्वांनी 243 विधानसभा मतदारसंघाची तयारी आतापासूनच सुरु करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.