esakal | चित्रा वाघ यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

चित्रा वाघ यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीची (भाजप) राष्ट्रीय कार्यकारिणी आज (गुरुवार) जाहीर झाली. यामध्ये भाजपच्या राज्य उपाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेल्या चित्रा वाघ यांच्यावर पक्षानं मोठा विश्वास टाकत बढती दिली आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची राष्ट्रीय सचिवपदी तर खासदार हीना गावित यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्तेपदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील तेरा जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयुष गोयल, चित्रा वाघ, प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुद्धे यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. तर विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: लखीमपूर प्रकरणी दोघांना अटक; केंद्रीय मंत्र्याचा मुलगा बेपत्ता

राष्ट्रीय प्रवक्तेपदी खासदार हीना गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विशेष निमंत्रित म्हणून सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, लद्दाराम नागवाणी यांची तर अल्पसंख्यांक मोर्चा सदस्यपदी जमाल सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: ''ओमकार बिल्डर आणि पवारांचे संबंध काय? अजित पवारांनी स्पष्ट करावे''

दरम्यान, महाराष्ट्राचे विधीमंडळ नेते म्हणून देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्षपदी मंगल लोढा तर महाराष्ट्र राज्य प्रभारी आणि सह प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभानसिंह पवैय्या यांची नियुक्ती कायम आहे.

loading image
go to top