चित्रकूट प्रकरणात माजी कॅबिनेट मंत्री गायत्री प्रजापतीसह तिघांना जन्मठेप: दोन लाखांचा दंड ; Gayatri Prasad Prajapati | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायत्री प्रजापती

गायत्री प्रसाद प्रजापती आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर चित्रकूटच्या एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता.

चित्रकूट प्रकरणात गायत्री प्रजापतीसह तिघांना जन्मठेप

चित्रकूट chitrakoot Rape Case) अल्पवयीन सामूहिक बलात्कार प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत युपीचे माजी कॅबिनेट मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती (Gayatri Prasad Prajapati) यांच्यासह तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. गायत्री प्रसाद प्रजापती, अशोक तिवारी आणि आशिष शुक्ला यांना जन्मठेपेची शिक्षा तर या प्रकरणातील संशयीत विकास वर्मा, अमरेंद्र सिंग उर्फ ​​पिंटू, चंद्रपाल, रुपेश्वर उर्फ ​​रुपेश यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार,

गायत्री प्रसाद प्रजापती आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर चित्रकूटच्या एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. बुधवारी(ता.११) रोजी न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पवन कुमार राय यांनी या प्रकरणी गायत्रीसह तीन आरोपींना दोषी ठरवले होते. तर आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गायत्री प्रसाद प्रजापती हे समाजवादी पार्टीचे माजी कॅबिनेट मंत्री आहेत. गायत्री आणि इतर सहा जणांवर चित्रकूटच्या एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या महिलेने सांगितले की, मंत्री आणि त्यांच्या साथीदारांनी नशा करून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. तक्रार दाखल करताच तिला धमकी देण्यात आली होती. शिवाय एफआयआर दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले होते.

हेही वाचा: तिळ्यांना जन्म देताच तिचा झाला मृत्यू ; 4 डॉक्टरांना नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गौतमपल्लीमध्ये गायत्री प्रजापतीविरुद्ध एफआयआर दाखल झाला होता.त्यानंतर गायत्री प्रजापती व इतर आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले. आणि आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

loading image
go to top