Delhi News: आवाजा’विरोधातील तक्रार ठरली जीवघेणी; संगीतकाराचा मारहाणीत मृत्यू; सात जणांना अटक

Manipur Musician Dies in Delhi After Assault Over Dhaba Noise: आवाजाच्या गोंधळाविरोधात तक्रार केल्याचा बदला म्हणून संगीतकार चोंगथाम विक्रम सिंह यांची निर्दयी मारहाण; ईशान्येकडील नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Delhi Assault Case Manipur Musician Chontham Vikram Singh Dies After Objecting to Loud Noise Seven Arrested by Police

Delhi Assault Case Manipur Musician Chontham Vikram Singh Dies After Objecting to Loud Noise Seven Arrested by Police

sakal

Updated on

नवी दिल्ली : घराजवळील धाब्यावरील आरडाओरड आणि गोंधळाबाबत तक्रार केल्याच्या रागातून झालेल्या मारहाणीत मणिपूरचे संगीतकार आणि प्रसिद्ध गिटारवादक चोंगथाम विक्रम सिंह (वय ५४) यांचा मृत्यू झाला. दिल्लीतील आश्रम परिसरातील किलोकरी गावात ही घटना काल घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सात जणांना अटक केली आहे तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com