#ChowkidarChorHai ट्रेंड टॉप टेनमध्ये

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

नवी दिल्लीः ''गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधल्यानंतर ट्विटरवर आज (शुक्रवार) #ChowkidarChorHai असा ट्रेंड टॉप टेनमध्ये आला आहे.

''गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुरुवारी (ता. 20) निशाणा साधला होता. बोफोर्स गैरव्यवहार समोर आल्यानंतर तत्कालीन विरोधीपक्षांनी राजीव गांधी यांच्याविरोधात घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर याच घोषणांचा वापर पंतप्रधान मोदींवर टीका करताना करण्यात आला.

भाजपनेत्या स्मृती इराणी यांच्यासह अनेकांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटरवर #ChowkidarChorHai या हॅशटॅग खाली नेटिझन्सनी छोटे-छोटे व्हिडिओ क्लिप्स, छायाचित्रे अपलोड केली आहेत. #ChowkidarChorHai हा ट्रेंड टॉप टेनमध्ये दिसत होता.

दरम्यान, राजस्थानातील डुंगरपूर येथे एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, ''बोफोर्स गैरव्यवहार समोर आल्यानंतर 'गली गली में शोर है, राजीव गांधी चोर है' अशा घोषणा 1980 मध्ये विरोधकांकडून देण्यात आल्या होत्या. या घोषणेवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे. ते म्हणाले, ''गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है''.

Web Title: #ChowkidarChorHai top trend in twitter