ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी ख्रिश्चियन मिशेलला 5 दिवसांची कोठडी

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने ख्रिश्चियन मिशेल यास 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने ख्रिश्चियन मिशेल यास 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांशी मध्यस्थी केल्याचा आरोप मिशेल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात या गैरव्यवहार प्रकरणाचा खटला सुरु आहे. मिशेल यांना आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी सीबीआयकडून अॅड. डी. पी. सिंह यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी मिशेल यांच्याकडून दुबईच्या दोन खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत. यांसारखे अनेक महत्वपूर्ण कागदपत्रांबाबत माहिती घ्यायची आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी 14 दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी सिंह यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, ख्रिश्चियन मिशेल यांना सीबीआयने काल (मंगळवार) रात्री दुबईहून भारतात आणले होते. भारतात आणल्यानंतर त्यांना थेट सीबीआय मुख्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली होती.

Web Title: Christian Michel sent to 5 days CBI custody