टीबीच्या जिवाणूची गुणसूत्रे, कोरोनात साम्य;‘आयसीएमआर’कडून नवे दिशानिर्देश जारी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 मे 2020

‘आयसीएमआर’ने चाचण्यांबाबतचे नवीन नियम जारी केले आहेत.क्षयरोगाच्या चाचण्यांसाठी असलेली TrueNat प्रणाली आता संशयित कोरोना रुग्णांवर चाचण्या करण्यासाठीही वापरता येऊ शकेल,असे स्पष्ट करण्यात आले.

नवी दिल्ली -  क्षयरोगाच्या चाचणीसाठी वापरली जाणारी यंत्रे (TrueNat प्रणाली) आता संशयित कोरोना रुग्णांच्या चाचण्यांसाठीही वापरता येऊ शकतात. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याबाबतचे आदेश देणारे सुधारित सूचना - दिशानिर्देश जारी केले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ज्या ‘मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस’, नावाच्या जीवाणूपासून क्षयरोग  होतो व हे जिवाणू पुढे मनुष्याच्या फुप्फुसात प्रवेश करून ती कमकुवत  करतात, त्याची गुणसूत्रे आणि ‘कोविड-१९’ चे विषाणू यांच्यात बरेचसे साधर्म्य असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. 

Lockdown : भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले

कोरोना चाचण्यांची रोजची संख्या वाढवत ती आता दीड लाखाच्या आसपास झाली असून आज सकाळी नऊपर्यंत २४ लाख,०४ हजार २६७ लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मे महिन्याची सुरुवात झाल्यापासून देशभरात दर दिवशी हजारोंच्या संख्येने नवीन रुग्ण येत आहेत. ते पाहता सध्याची चाचण्यांची यंत्रणा राज्य सरकारांना अपुरी पडत असल्याचे दिसून येते. त्यादृष्टीने ‘आयसीएमआर’ने चाचण्यांबाबतचे नवीन नियम जारी केले आहेत. क्षयरोगाच्या चाचण्यांसाठी असलेली TrueNat प्रणाली आता संशयित कोरोना रुग्णांवर चाचण्या करण्यासाठीही वापरता येऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तर पुढील उपचार 
नव्या सूचनांनुसार आयसीएमआरने हेही स्पष्ट केले आहे की, ‘‘ एखाद्या संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्याच्या आणखी चाचण्या घेण्यात येऊ नयेत. कोरोना रुग्णालयांमध्ये एखाद्या रुग्णाचा अहवाल पहिल्या टप्प्यात पॉझिटिव्ह आला तरच त्याच्या रक्ताच्या दुसऱ्या टप्प्यातील कोरोना चाचण्या केल्या जाव्यात. दुसऱ्या वेळीही अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्या रुग्णाला कोरोना रुग्ण समजण्यात यावे आणि पुढील उपचार सुरू करावेत.’’ 

त्यांना चाचणी बंधनकारक 
रेड आणि कंटेन्मेंट झोनमध्ये काम करणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका आणि कोरोना रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी आपली कोरोना चाचणी दर सात दिवसांनी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परदेशातून येणाऱ्या ज्या प्रवाशांमध्ये इन्फ्ल्यूएन्झाची लक्षणे आढळतील त्यांनीही पुढच्या सात दिवसांत चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chromosomes of the TB bacterium resemble corona Guidelines issued by ICMR

टॅग्स
टॉपिकस