हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची सजा

सरकारने आरोग्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हा निर्णय घेतला आहे, असे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सांगितले.
Cigarettes Tobacco Hookah Bar Ban Bill Passed
Cigarettes Tobacco Hookah Bar Ban Bill Passedesakal
Summary

याव्यतिरिक्त राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर बंदी (Hookah Bar Ban) घालण्यासाठी विधेयक मंजूर केले. ज्यामध्ये कठोर दंडासह, एक ते तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि प्रतिबंधाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळलेल्यांना एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.

Cigarettes Tobacco Hookah Bar Ban Bill Passed
बेळगाव सीमाप्रश्‍नाचा तिढा सुटणार? महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात मांडणार भक्कमपणे बाजू; मुंबईतील बैठकीत निर्णय

अधिसूचनेनुसार नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि तंबाखूजन्य आजारांना आळा घालण्यासाठी विद्यमान सिगारेट (Cigarettes) आणि इतर तंबाखू (Tobacco) उत्पादने कायद्यामध्ये (सीओटीपीए) सुधारणा केल्यानंतर ही बंदी लागू केली आहे. याव्यतिरिक्त राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

Cigarettes Tobacco Hookah Bar Ban Bill Passed
कुठेही चिरफाड न करता रुग्णाच्या घशात अडकलेला माशाचा काटा काढण्यात डॉक्टरांना यश; अन्न गिळताना होत होता त्रास

सुधारित विधेयक सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर पूर्णपणे बंदी असणार आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटरच्या परिघात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. सरकारने आरोग्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हा निर्णय घेतला आहे, असे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सांगितले.

Cigarettes Tobacco Hookah Bar Ban Bill Passed
Divorce Cases : वादाचा विस्फोट, तब्बल 221 घटस्फोट; विवाहपूर्व समुपदेशनाचा आग्रह धरण्याची गरज!

जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही कारवाई केली आहे. त्यानुसार कर्नाटकातील २२.८ टक्के प्रौढ तंबाखूचा वापर करतात. तर ८.८ टक्के जण धूम्रपान करतात. अहवालात असेही म्हटले आहे, की राज्यातील २३.९ टक्के प्रौढ हे निष्क्रिय धूम्रपान करणारे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com