CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

CISF Camp Firing जम्मू काश्मिरच्या कठुआ इथं सीआयएसएफ कँपमध्ये एका जवानाने सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडलीय. या घटनेत असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.
CISF Jawan Opens Fire at Kathua Camp

CISF Jawan Opens Fire at Kathua Camp

Esakal

Updated on: 

जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सीआयएसएफ कँपमध्ये झालेल्या गोळीबारात चार सीआयएसएफ जवानांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. सेवा २ हायड्रो इलेक्ट्रिक पावर प्रोजेक्टमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या सीआयएसएफ जवानांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. याच वादातून एका जवानाने सहकाऱ्यांवर गोळीबार केला. यात असिस्टंट कमांडंटसह ४ सीआयएसफ जवानांचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com