सरकारची उदासिनता, नागरिकांनी स्वतःच बांधला नदीवर पुल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

गुवाहाटी : आसाम राज्यातील कामरूप आणि बारपेटा जिल्ह्यातील नागरिकांनी कालाही नदीवर बांबूच्या साह्याने स्वतःच पुल उभारला आहे. या पुलाला बांबू पुल असे म्हटले जाते. आश्वासनांचा पाऊस पाडणे हे राजकिय पुढाऱ्यांचे नित्याचे काम. पण या पावसाचा कोणला कसलाही उपयोग होत नाही. 

आसाम मधील कामरूप आणि बारपेटा जिल्ह्यातील कालाही नदीवर पुल बांधून देण्याची अनेक आश्वासने सरकारने दिली होती. ती कधीच हवेत विरून गेली. सरकारकडे वारंवार निवेदने, अर्ज, पाठपुरावा करूनही केवळ त्याला केराची टोपलीच दाखविण्यात आली. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्वतःच पारंपारिक पद्धतीने पुलाची उभारणी केली. 

याविषयी स्थानिक नागरिक म्हणाले, सरकारकडून आम्हाला कालाही नदीवर पुल बांधून देण्याचे आश्वासन मिळाले होते. पण त्याचे काय झाले माहित नाही. त्यामुळे आम्ही स्वतःच हा पुल बांधला. या पुलाचा वापर या भागातील शाळा, कॉलेजात जाणारे विद्यार्थी आणि कामाधंद्यासाठी जाणाऱ्या अनेकांना करता येणार आहे.

Web Title: the citizens themselves built the bridge over the river