
सामान्य नागरिकाचं एखादं काम करण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयात कर्मचारी, अधिकारी अडवणूक करतात. नागरिकांकडून पैसे घेऊन ते काम लगेच करून देतात. आता अशाच एका खाबुगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याला वैतागून नागरिकांनी चक्क नोटांचा पाऊस पाडल्याचा प्रकार घडलाय. सतत लाच मागत असल्यानं नाराज होऊन ग्रामस्थांनी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन नोटा उधळल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.