बेळगावात शहर बससेवा आज बंद

बेळगावात शहर बससेवा आज बंद

बेळगाव - राष्ट्रपतींच्या बेळगाव दौऱ्यामुळे शनिवारी (ता. १५) शहर वाहतूक सेवा बंद राहणार आहे. बाहेरुन येणाऱ्या परिवहनच्या बसेससाठी शहराबाहेरच पाच पिकअप पॉईंट उभारण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस आयुक्तांनी शहर सेवा बंद ठेवण्याची सूचना शुक्रवारी (ता. १४) केल्याने वायव्य परिवहन मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

सर्किट हाऊस जवळच असल्याने सीबीटी आणि मध्यवर्ती बसस्थानक शनिवारी सायंकाळी सहापर्यंत बंद राहणार आहे. याकाळात स्थानकातून एकही बस सुटणार नाही. पोलिस आयुक्तालयाने सुचविलेल्या मार्गानुसार शहराबाहेरील परिवहन सेवेसाठी पाच ठिकाणी पिकअप पॉईंट शनिवारपुरते उभारले जाणार आहेत. 

त्याचा वापर केवळ आंतरराज्य आणि लांब पल्ल्याच्या बसेससाठी केला जाणार आहे. शहरसेवेचा मुख्य मार्ग शिवाजी रोड ते कॉलेज रोड असा ठरविण्यात आल्याने शनिवारी सायंकाळी सहापर्यंत शहरातून बसेस धावणार नाहीत. या समस्येमुळे शनिवारी अनेक शाळा आणि महाविद्यालयांनाही सुटी जाहीर केली आहे.

पोलिसांनी हैदराबाद, रायचूर आणि विजापूरकडून येणाऱ्या बसेसना बेळगावपासून १९ किलोमीटरवरील मारिहाळमध्येच थांबविले आहे. शनिवारी सकाळी आठपासूनच मारिहाळ ते बेळगावपर्यंतच्या मार्गावरील वाहतूक सेवा बंद राहणार आहे. तर गोव्याकडील वाहने पिरनवाडीत थांबविली जाणार आहेत. अनगोळ, वडगाव, टिळकवाडी, उद्यमबाग, केएलई मार्गावरील सर्व ठिकाणची बससेवाही बंद राहणार आहे.

पोलिस आयुक्तांच्या सुचनेनुसार शहराबाहेर पाच ठिकाणी परिवहनचे पिकअप पॉईंट निश्‍चित केले असले तरी तेथपर्यंत जाण्यासाठीही प्रवाशांना कसरत करावी लागणार आहे. कपिलेश्‍वर ब्रिज मार्ग, कॉलेज रोड बंद ठेवला आहे. तर पोलिस आयुक्तांनी शहर बससेवा सकाळी आठ ते सहापर्यंत बंद ठेवण्याची सूचना केली आहे.
- एम. आर. मुंजी, 

   नियंत्रक, परिवहन मंडळ बेळगाव विभाग

परिवहनच्या बसेससाठी पिकअप पॉईंट्‌स
स्थळ    बसेसचे मार्ग
धर्मनाथ भवन, अशोकनगर    काकती, कोल्हापूर, पुणे-मुंबई
पिरनवाडी    खानापूर, गोवा
जुने बेळगाव अंडरपास    धारवाड, बंगळूर
मारिहाळ    बागलकोट, रायचूर, हैदराबाद
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com