हैदराबाद : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई (CJI BR Gavai) यांनी भारतीय न्यायव्यवस्थेतील उणिवांकडे बोट दाखवत मोठे विधान केले आहे. गवईंनी स्पष्टपणे सांगितले की, 'न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याची नितांत गरज आहे, कारण सध्याची यंत्रणा अनेक गंभीर आव्हानांना तोंड देत आहे. एक दशकाहून अधिक काळ चालणारे खटले, विलंबाने मिळणारा न्याय ही गंभीर बाब असून बदल न झाल्यास नागरिकांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो', असा त्यांनी इशारा दिला.