तुम्ही यांना ओळखलंत का? बाईकवरील फोटोने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जून 2020

सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात कधी कशाची चर्चा होईल आणि कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सोशल मीडियावर या फोटोची सर्वत्र चर्चा आहे.

नवी दिल्ली : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात कधी कशाची चर्चा होईल आणि कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सोशल मीडियावर या फोटोची सर्वत्र चर्चा आहे. कारणही तसेच आहे, सरन्यायधीश शरद बोबाडे यांचा हा फोटो असून हार्ले डेविड्सन या स्पोर्ट्स मोटारबाईकवरील त्यांच्या फोटोवरून सोशल मीडियावर सध्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. हा फोटो नागपूर येथिल त्यांच्या निवास्थाबाहेरील असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शरद बोबाडे यांच्या या फोटोवरून अनेकांनी त्यांनी मास्क घातला नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. एका दिवसाला कोरोनाबाधितांचा आकडा आता साडेपाच लाखांच्या जवळ गेला असून एका दिवसाला जवळपास २० हजाराने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना सरन्याधीश असे कसे वागू शकतात असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या सुरक्षारक्षकांनीही मास्क न घातल्याचे नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यावेळी त्यांनी हेल्मेट घातले नसल्याचेही काही जण म्हणतात. त्यांच्या स्पोर्ट्स आणि महागड्या बाईक वापरावरूनही काही जणांनी प्रश्न केले आहेत. मात्र अशावेळी त्यांच्या बाईक वापराचे काही लोकांनी समर्थनही केलेले दिसून येते. बोबाडे यांच्या लाईफस्टाईलवरून सातत्यानेच चर्चा होत आली आहे.

-----------
'या' देशाचा भारताला पाठिंबा; हिंद महासागरामध्ये केला एकत्रित युद्धसराव
-----------
सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा
-----------
दरम्यान, शरद अरविंद बोबाडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ झाला असून हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश आहेत. ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत. ते दिल्ली विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूरचे कुलपती म्हणूनही कार्यरत आहेत. बोबाडे हे नागपूर येथील वकिलांच्या कुटुंबातून आले आहेत. त्याचे आजोबा वकील होते. बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे १९८० आणि १९८५ मध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CJI Bobde rides Harley Davidson in Nagpur photos go viral