

CJI BR Gavai
esakal
भारताच्या न्यायव्यवस्थेत न्यायाधीश निवृत्तीनंतरही आपल्या निकालांवर फारसे बोलत नाहीत, ही एक जुनी परंपरा आहे. मात्र मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी ही परंपरा मोडली. निवृत्तीच्या दोन दिवस आधी, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या निरोप समारंभात त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्यांनी दिलेला सर्वात महत्त्वाचा निकाल म्हणजे ‘बुलडोझर जस्टिस’ला थांबविणारा निकाल होता.