अयोध्याप्रकरणाचा निकाल दृष्टीक्षेपात; पाहा कधी लागू शकतो निकाल

टीम ई-सकाळ
Wednesday, 18 September 2019

नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर प्रकरणात लवकरच निकाल लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासंदर्भात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी विश्वास व्यक्त केला असून, त्यांनी १८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंच्या निर्णयाबाबत काय म्हणाले शरद पवार?

नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर प्रकरणात लवकरच निकाल लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासंदर्भात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी विश्वास व्यक्त केला असून, त्यांनी १८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंच्या निर्णयाबाबत काय म्हणाले शरद पवार?

मध्यस्थीला मान्यता 
अयोध्या राजजन्मभूमीप्रकरणात २६व्या दिवसाची सुनावणी पूर्ण झाली. या मुद्द्यावर मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी मोठी घोषणा केली आहे. २७ सप्टेंबरपर्यंत मुस्लिम पक्षकार आपला युक्तीवाद पूर्ण करतील. त्यावर मुस्लिम पक्षकार राजीव धवन यांनी प्रतिक्रिया दिली असून, ‘पुढच्या आठवड्यापर्यंत आम्ही आमचा युक्तीवाद पूर्ण करू,’ असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, सरन्यायाधीशांना पक्षकारांना मध्यस्थीलाही मान्यता दिली आहे. या संदर्भात सरन्यायाधीश गोगोई म्हणाले, ‘मध्यस्थी संदर्भातील मागणीचे पत्र आम्हाला मिळाले आहे. आमची मध्यस्थी करण्याला मान्यता आहे. जर, दोन्ही पक्ष आपसात मध्यस्थी करून तोडगा काढू इच्छीत असतील तर, त्यांनी मध्यस्थी करावी आणि कोर्टापुढे ठेवावी. या मध्यस्थीविषयी गोपनीयता ठेवण्यात येईल.’ सरन्यायाधीशांनी सांगितले की, आम्हाला अपेक्षा आहे, येत्या १८ ऑक्टोबरपर्यंत याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होईल. त्यासाठी आपल्या सगळ्यांनाच एकत्र प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर निकाल लिहिण्यासाठी न्यायाधीशांना चार आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.

राष्ट्रवादी घेरणार उदयनराजेंना; चौघे जण मैदानात उतरण्याच्या तयारीत

गोगोई यांची निवृत्ती आणि निकाल
दरम्यान, मधल्या काळातही सुनावणी सुरू राहणार आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अयोध्येचा निकाल आणि सरन्यायाधीश  गोगई यांची निवृत्ती यांचा येथे संदर्भ येत आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी झाल्यानंतर निकाल टाईप करण्यासाठी चार आठवडे लागणार आहे. त्यामुळे पुढे १७ नोव्हेंबरपर्यंत अयोध्या प्रकरणाचा निकाल लागेल, असे दिसत आहे. विशेष म्हणजे, सरन्यायधीश १७ नोव्हेंबरलाच निवृत्त होत आहेत.त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या आता अयोध्या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर भडकले भाजप आमदार

महत्त्वाचे

  1. सर्वोच्च न्यायालयात २६व्या दिवसाची सुनावणी पूर्ण; मध्यस्थीला न्यायालयाची मान्यता
  2. गोगई यांच्या निवृत्तीपूर्वीच निकाल जाहीर होणे अपेक्षित, अन्यथा पुन्हा सुनावणीची सगळी प्रक्रिया होणार
  3. सुनावणीसाठी शनिवारी जादा एक तास कामकाज करण्याची न्यायालयाची तयारी
  4. पक्षकारांना त्यांचे युक्तीवादाचे नियोजन देण्याचे न्यायालयाचे आदेश

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cji supreme court ranjan gogoi on ayodhya case 18 october deadline for arguments