

CJI Surya Kant
esakal
भारताचे नवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सोमवारी (११ नोव्हेंबर) पदभार स्वीकारला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेताना दिल्लीतील हवेच्या बिकट अवस्थेवर त्यांनी थेट बोट ठेवले. वरिष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन हे एका खटल्यात युक्तिवाद करत असताना अचानक त्यांना खोकला आला त्यांचा आवाज बसला.
त्यांनी न्यायाधीशांना म्हटले, “माफ करा, माझा आवाज गेला आहे.” यावर तत्काळ सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी हसत हसत उत्तर दिले, “होय, आता तर संपूर्ण दिल्लीचीच अशी अवस्था झाली आहे!”