

CJI Surya kant
esakal
NALSAR Controversy: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च युनिव्हर्सिटी ऑफ लॉच्या दीक्षांत सोहळ्याच्या वादावर प्रतिक्रिया दिलीय. विद्यार्थी आंदोलनावर लाठीचार्ज आणि त्यासंबंधित याचिकेवर सरन्यायाधीशांनी केलेली टिप्पणी यामुळे सरन्यायाधीशांवर विद्यार्थ्यांचा रोष होता. त्यामुळे त्यांना पदवीदान सोहळ्याला बोलावू नये अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती. यानंतर संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाईच्या भूमिकेवर प्रशासनाला युटर्न घ्यावा लागला होता. आता सरन्यायाधीशांनीच पदवीदान सोहळ्याचा प्रमुख पाहूणा म्हणून येण्याचं निमंत्रण नाकारलं आहे.